रोट्रॅक्ट क्लब ऑफ बेळगावतर्फे काॅरंटाईन असलेल्या कोरोना बाधित कुटुंबांच्या मदतीसाठी खास वेबसाईट सुरू करण्यात आली असून त्याचा लाभ संबंधितांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. रोटरी क्लब ऑफ बेळगावने सदर उपक्रम पुरस्कृत केला आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या सध्याच्या संकटात कोरोनाबाधित अनेक कुटुंबे काॅरंटाईन आहेत. या काॅरंटाईनचा कालावधी 14 दिवसापर्यंत असल्यामुळे संबंधित कुटुंबांना जीवन आवश्यक साहित्य औषधे आदी गोष्टी मिळणे कठीण जात आहे. हे लक्षात घेऊन रोट्रॅक्ट क्लब बेळगावने त्यांच्या मदतीसाठी www.bgmcovidrelief.in ही वेबसाइट सुरू केली असून ज्यामुळे जीवनावश्यक साहित्य, औषधे वगैरे बाधितांच्या घराच्या दारापर्यंत पोहोचणार आहे.
स्पेशल काॅरंटाईन किट पासून संबंधित औषधे, जीवनावश्यक साहित्य, घरगुती जेवण, हॉस्पिटल सेवा, ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर आदी सर्व गोष्टी या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहेत.
तेंव्हा गरजू लोक या वेबसाईटचा उपयोग करून घेऊ शकतात. रोट्रॅक्ट क्लब ऑफ केएलई, व्ही. के. इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल सायन्स, माहेश्वरी महिला मंडळ आणि आर्ट इम्पॅक्ट अॅन्ड ऐरोनर टेक्नॉलॉजी यांचादेखील या उपक्रमात सहभाग आहे.
या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या दुकानदारांनी वेबसाईटमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे.