काल बुधवारी रात्री मुंबईहून गोकाक येथे आलेले माजी मंत्री आणि आमदार रमेश जारकीहोळी आज गुरुवारी सकाळी गोकाकहून बेंगलोरला रवाना झाले.
मंत्रिपदाच्या राजीनाम्यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारणा केली असता शनिवारी परत आल्यानंतर सर्व कांही सांगतो असे आश्वासन आमदार रमेश जारकीहोळी यांनी दिल्याचे समजते.
गोकाक येथील विद्यार्थ्यांना टॅब आणि महिलांना शिलाई यंत्राचे वितरण केल्यानंतर जारकीहोळी आज गुरुवारी सकाळी गोकाकहून रस्ते मार्गाने बेंगलोरला रवाना झाले.
जारकीहोळी आपल्या समोरील अडचणी अधिकच वाढल्यामुळे ते बेंगलोर मुक्कामी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची भेट घेण्याची शक्यता आहे.