पोलीस खुनी दरोडेखोर चोरांना फसवेगिरी करणाऱ्याला अटक करतात हे आम्ही पाहिलं आहे मात्र बेळगाव पोलिसांनी दुसऱ्या पोलिसाला अटक केली आहे.
गुन्हे अन्वेषण शाखेचा पोलिस आहे असे सांगून लॉकडाऊन मध्ये शहरातील मार्केट मध्ये पैसे वसुली करणाऱ्या एका के एस आर पी पोलीस कॉन्स्टेबलला पोलिसांनी अटक केली.
सिद्धरुढ वडडर के एस आर पी दुसरे बटालियन असे या पोलिसांचे नाव आहे.गणपत गल्ली आदी मार्केट भागांत लॉकडाऊन काळात अनेक दुकानांतून पैसे वसुली केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी मार्केट पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.