खानापूर मधून बेपत्ता झालेली मुलं मलप्रभा नदीत बुडून मृत्युमुखी पडली आहेत.श्रेयस महेश बापशेट वय 13 व रोहित अरुण पाटील वय 15 असे त्या दुर्दैवी मुलांची नावे आहेत.
सोमवारी दुपारी अडीच वाजता ती मुले घरातून बाहेर पडली होती ती परतली नव्हती.श्रेयस याचा मृतदेह रेल्वे ट्रॅक लाल ब्रिजच्या वरच्या बाजूला मलप्रभा नदीच्या पात्रात सापडला असून रोहित याचा मृतदेहाचा शोध घेतला जात आहे.
अशी घडली होती घटना
खानापूर मधील पाच सहा मुलं नदी पात्रात पोहण्यासाठी गेली होती पण पोहता येत नसल्याने ती नदी पात्रात बुडाली हे पाहून इतर मुले घाबरली व पालक ओरडतील या भीतीने त्यांनी बुडालेल्या मुलांचे कपडे आणि चप्पल खड्डा काढून पुरल्या गुपचूप आपापल्या घरी गेली कोणालाही या गोष्टीची कल्पना दिली.
मंगळवारी सकाळी अधिक चौकशी केली असता त्यातील मुलांनी हा प्रकार सांगितला घडलेली घटना आणि जागा दाखवली त्या नंतर पोलीस व अग्निशमन दलाने शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.
एक मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी खानापूर पोलिसांत गुन्हा नोंद केला जात आहे.