बेळगाव जिल्हा अंध सेवा संस्थेच्या नेहरूनगर येथील माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेत नूतन वर्षासाठी विद्यार्थांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी 6 ते 10 वर्षे वयोगटातील दृष्टिदोष असलेल्या मुला-मुलींना प्रवेशासाठी आवाहन करण्यात आले आहे.
माहेश्वरी अंध मुलांची शाळा ही अंध विद्यार्थ्यांसाठी निवासाची सोय असलेली एक अत्युत्तम शाळा असून सध्या शहर आणि ग्रामीण भागातून आलेले 133 अंध विद्यार्थी येथे शिक्षणाचा लाभ घेत आहेत. या शाळेत इयत्ता पहिली ते दहावी मध्ये प्रवेश देण्यात येत आहे. यासाठी 6 ते 10 वर्षे वयोगटातील दृष्टिदोष असलेल्या मुला-मुलींना प्रवेशासाठी आवाहन करण्यात आले आहे. सदर शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वसती व जेवणासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यवसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, पाठ्यपुस्तक आणि औषधोपचाराची सोय करण्यात येते.
तेंव्हा इच्छुकांनी शाळा प्रवेशासाठी संबंधित विद्यार्थ्यांचा जन्मदाखला, अंधत्वाबद्दलचे वैद्यकीय प्रमाणपत्र, युडीआयडी कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, उत्पन्न व जाती रहिवासी दाखला, आई-वडील आणि विद्यार्थ्यांचे आधार कार्ड जॉईंट बँक पासबुक ही कागदपत्रे घेऊन अर्जासह शाळेत भेटावे. तसेच अधिक माहितीसाठी 0831 -2470709 किंवा 9448954235 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याध्यापिका अनिता गावडे यांनी केले आहे.