Friday, April 26, 2024

/

झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या

 belgaum

झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या-गावानजीकच्या झाडाला गळफास घेऊन एका प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यात उघडकीस आली आहे.

पंचप्पा कणवी (वय 25) आणि सक्कुबाई करीगार अशी आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलांची नांवे आहेत. सौंदत्ती तालुक्यातील सिंदोगी गावातील या प्रेमीयुगुलामध्ये गेल्या महिनाभरापासून वादावादी सुरू होती.

या वादावादीचे पर्यवसान नैराश्येच्या भरात दोघांनीही गावानजीकच्या आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करण्यामध्ये झाल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.