कोरोना काळात मृत्यू पावलेल्या एलआयसी एजंटांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जावी त्याशिवाय या काळातील एलआयसी प्रीमियम वर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येऊ नये तसेच ग्राहकांनी घेतलेल्या कर्जाचे व्याजदर रिझर्व्ह बँके प्रमाणे कमी करावे अशा अनेक मागण्या करतात लाइफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या बेळगाव शाखा नंबर एक च्या वतीने आंदोलन करण्यात आले.
एलआयसी एजंट फेडरेशन तर्फे 16 ते 30 जून या काळात देशव्यापी आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे त्याचाच एक भाग म्हणून एलआयसी एजंट आणि बेळगाव येथील शाखा नंबर एक समोर फेडरेशनच्या वतीने एलआयसी समोर 14 मागण्या ठेवल्या असून त्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत होत नाहीत तोपर्यंत आंदोलन छेडण्याचा इशारा दिलेला आहे.
30 जूनपूर्वी मागण्या मान्य न झाल्यास नंतरही आंदोलन सुरू केले जाईल अशी माहिती विभागीय अध्यक्ष किरण कल्लोळ यांनी दिली.
बेळगाव येथील शाखा नंबर एक च्या कार्यालयासमोर सर्व विमा एजंट एजंटानी आंदोलन छेडले होते. यावेळी ब्रंच बँकेच्या शाखेचे अध्यक्ष हेमंत सोहनी. महेंद्र बागेवाडी आदींनी आपले विचार मांडले .
त्याशिवाय कोरोना काळात कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारणी केली जाऊ नये प्रीमियम वर असणारे जीएसटी कमी केला जावा एलआयसी एजंट ग्रॅज्युटी सुरू करावी ग्रुप इन्शुरन्स वाढवला जावा अशा मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.