कर्नाटकात अन लॉक प्रक्रियेला सात जून पासून निश्चित सुरुवात होईल असे कर्नाटकचे उप मुख्यमंत्री अश्वत्थ नारायण यांनी बंगलोर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
लॉक डाऊन चे निर्बंध एकदम उठवले जाणार नाहीत.
निर्बंध टप्प्याटप्प्याने उठवले जातील . लॉक डाऊन चे निर्बंध कशा पद्धतीने उठवायचे या बाबत तज्ज्ञांशी बोलणे सुरू असून त्या बद्दल वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्यात येत असल्याचे नारायण यांनी सांगितले.
आरोग्य मंत्री के सुधाकर यांनी देखील अन् लॉक बाबत भाष्य केले आहे.तज्ञ समितीने रुग्णांची संख्या पाच हजार खाली आल्यावर लॉक डाऊन ची बंधने उठवावित असा सल्ला दिला आहे.रुग्ण वाढण्याचा पॉ जी टी व्हीटी रेट पाच टक्क्यांची च्या खाली म्हणजे रुग्ण संख्या पाच हजार खाली आली पाहिजे.
रुग्ण संख्या कमी होत नाही तोपर्यंत बंधने कायम ठेवावीत अशी शिफारस तज्ञ समितीने केली आहे.या बाबतचा अहवाल आरोग्य मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
लॉक डाऊन एकदम उठवता येणार नाही. लॉक डाऊन टप्प्याटप्प्याने उठवले जाईल असे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले आहे.