महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कृष्णा नदीच्या अतिरिक्त पाण्यामुळे कोल्हापूर सांगली भागात होणाऱ्या संभाव्य पुर रोखण्यासाठी आता पासूनच पाऊले उचलायला सुरुवात केली आहे.याविषयी ते कर्नाटकाचे जलसंपदा मंत्री मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांचीही भेट घेणार आहेत.
सोशल मीडियावर पोस्ट करत जयंत पाटील यांनी कर्नाटकाच्या मंत्र्यांना भेटणार असल्याचं म्हटलं आहे.मागील वर्षी तत्कालीन मंत्री रमेश जारकीहोळी आणि जयंत पाटील यांची मुंबईत बैठक झाली होती मात्र यावर्षी जारकीहोळी मंत्री पदावर नाहीत त्यामुळे पाटील आता थेट मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत.
सातारा, सांगली भागात २०१९ मध्ये आलेल्या पुराची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून आम्ही कायमच प्रयत्नशील आहोत. मागील वर्षी देखील राज्याच्या जलसंपदा विभागाने पाण्याचे सुव्यवस्थित नियोजन करून पूर परिस्थिती टाळली होती. पूर परिस्थिती पुन्हा उदभवू नये, म्हणून यापूर्वी कर्नाटक राज्यासोबत मुख्य अभियंता व सचिव स्तरावरील चर्चा झालेल्या आहेत असे सांगत जयंत पाटील यांनी याबाबतीतच मी उद्या(शनिवारी) जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत कर्नाटकचे मा. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची भेट घेणार असल्याची माहिती दिली
या बैठकीत महाराष्ट्र राज्याच्या भीमा व कृष्णा खोऱ्यातून सोडला जाणारा विसर्ग व त्याच्या माहितीचे आदान- प्रदान यासाठीची यंत्रणा, दोन्ही राज्याच्या धरण व्यवस्थापन व पूर नियंत्रणाबाबत संयुक्त आराखडा व कार्यप्रणाली निश्चित करणे, कर्नाटक राज्याने अलमट्टी धरणातून पाणी साठवणे व पाणी सोडण्याचे नियोजन, पूर नियंत्रण व व्यवस्थापनासाठी विविध स्तरावरील कार्यपद्धतीची चर्चा व इतर तदनुषंगिक मुद्द्यांबाबत सविस्तर चर्चा होणार आहे.असे देखील पाटील यांनी म्हटलं आहे.
या भेटीत सीमा प्रश्न किंवा बेळगावतील मराठी भाषिकांच्या याबाबत चर्चा होणार का याकडे देखील लक्ष लागून राहील आहे.