युवा सबलीकरण आणि क्रीडा खाते, राष्ट्रीय आरोग्य आणि नर विज्ञान संस्था, परिवर्तन योग फौंडेशन तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शुक्रवार दि. 11 ते सोमवार दि. 21 जून 2021 या कालावधीमध्ये दररोज सकाळी 6:30 ते 8 वाजेपर्यंत 7 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे.
ऑनलाइन (झूम व युट्युब) पद्धतीने साजरा केल्या जाणाऱ्या या योग दिनानिमित्त सलग अकरा दिवस योगाशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
तरी या कार्यक्रमांमध्ये युवक-युवती, क्रीडापटू आणि युवक संघ -मंडळांच्या सदस्यांनी बहुसंख्येने सहभागी होऊन कार्यक्रमांचा सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहन युवा सबलीकरण क्रीडा खात्याच्या उपसंचालकांनी केले आहे.
यासाठी ऑनलाईन लिंकची माहिती पुढीलप्रमाणे आहे. झूम लिंक :मीटिंग आयडी 88904655436, पासवर्ड -429186. युट्युब लाईव्ह लिंक -http://youtube.com/c/Yuvaspandan