कोरोना प्रादुर्भावाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने दक्ष राहिले पाहिजे. कारण या लाटेचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर देखील आहे असे म्हटले जात आहे भूतरामनहट्टी प्राणीसंग्रहालयातील प्राणी दत्तक घेण्यासाठी लोकांनी पुढे यावे, असे आवाहन केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी केले आहे.
बेळगाव शहरात आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आमदार जारकीहोळी बोलत होते. राज्यातील अनेक ठिकाणी लाॅक डाऊन खुला करण्यात येणार आहे. परंतु मुलांसाठी घातक असलेल्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यास सरकारने आतापासून सज्ज राहिले पाहिजे. ही लाट प्रशासनासाठी मोठी आव्हान ठरणार आहे.
राज्यातील नेतृत्व बदलाबद्दल बोलताना राज्यात नेतृत्व बदलाचा प्रयत्न होत असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष अरुण सिंग उद्या राज्यात येणार आहेत. तथापि त्याच्याशी आमचे कांही देणेघेणे नाही. या सर्व त्यांच्या पक्षांतर्गत बाबी आहेत. भाजपचे राज्य प्रभारी हायकमांडला काय रिपोर्ट देता त्यावर सर्व कांही अवलंबून आहे असेही सतीश जारकीहोळी म्हणाले.
कोरोना प्रतिबंधक लस देण्याच्या मोहिमेमध्ये काँग्रेसने देखील पुढाकार घेतला आहे. या मोहिमेसाठी काँग्रेस पक्षाला किती पैसे मंजूर होतात ते पाहूया. तथापि ही लस रुग्णालयातच दिली जावी. तसेच लसीची कमतरता भरून काढून प्रत्येकाला लस मिळेल याची दक्षता घेतली जावी.
बेळगावातील भुतरामनहट्टी येथील राणी कित्तूर चन्नम्मा प्राणीसंग्रहालयातील प्राणी दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्याच्या लॉकडाउनच्या काळात या प्राणिसंग्रहालयाला उत्पन्न मिळेनासे झाले आहे. त्यामुळे प्राण्यांच्या देखभालीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
यासाठी या प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना दत्तक घेण्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी शेवटी केले.