कृष्णा स्पीच थेरपी आणि हिअरींग क्लीनिकतर्फे ‘डॉक्टर्स डे’ चे औचित्य साधून येत्या दि. 1 जुलै 2021 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत एक दिवसाचे मोफत कान आणि वाचा तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
कोरोना प्रादुर्भाव काळात सर्वसामान्य जनतेसाठी मदतीचा हात म्हणून ‘डॉक्टर्स डे’ चे औचित्य साधून कृष्णा स्पीच थेरपी आणि हिअरिंग क्लिनिकच्या ऑडिओलॉजी विभागामार्फत आयोजीत या शिबिरात कानाच्या वेगवेगळ्या तपासण्या तज्ज्ञांद्वारे करण्यात येतील. यामध्ये ज्या रुग्णांना ऐकण्यासंबंधी तीव्र ते अतितीव्र प्रकारचा श्रवण दोष तसेच त्याही पेक्षा जास्त श्रवण दोष आढळून आल्यास संबंधित रुग्णाला श्रवण यंत्राची गरज असू शकते.
पण सामान्य रुग्णांना नामांकित कंपन्यांचे महागडे श्रवणयंत्र घेणे शक्य होत नाही, म्हणून या एक दिवसीय शिबिरामध्ये गरजू रुग्णांना कमीत कमी दरामध्ये नामांकित कंपन्यांचे श्रवण यंत्रं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. शिबिरासाठी निवड झाल्या सर्वच रुग्णांची तपासणी निशुल्क केली जाणार आहे.
या व्यतिरिक्त सदर शिबिरात ज्या रुग्णांना बोलण्या संबंधित समस्या आहेत. त्यांना वाचा उपचार तज्ञांकडून मोफत स्पीच थेरपी देण्यास आवश्यक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच ज्या रुग्णांच्या श्रवण यंत्रात दोष आहेत त्या श्रवण यंत्रांचे सुटे भाग माफक दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे शिबिर कोरोनाचे सर्व अटी -नियम काटेकोरपणे पाळून आयोजित केले जाणार आहे.
काकतीवेस रोड येथील प्रसाद मेडिकल समोरील शारदा जम्बो झेरॉक्स शेजारी असलेल्या कृष्णा स्पीच थेरपी आणि हिअरींग क्लीनिकमध्ये हे शिबिर भरविण्यात येणार आहे. तरी गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा. तसेच नांव नोंदणीसाठी 9492853815 किंवा 8088559289 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन क्लिनिकच्या व्यवस्थापकांनी केले आहे.