मुख्यमंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्याच्या पाश्वभूमीवर सुवर्ण सौध समोर हलगा मच्छे बायपास रद्द करा यासह अनेक मागण्या पूर्ण करा अश्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मुख्यमंत्र्यासमोर शेतकऱ्यांच्या हलगा मच्छे बायपास रद्द करा,शेतकऱ्यांची पिकं भात,सोयाबीन,इतर धान्य, भाजी पाल्याला कवडीमोल भाव पण शासनाच्या बियाणांचा भाव दुप्पट, रासायनिक खताचां तुटवडा,शेतकऱ्यांचे उसाचे थकीत बील द्या तसेच इतर मागण्या करण्यासाठी शेतकरी हलगा येथे गेले असता शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं आणि पोलीस स्थानकात स्थानबद्ध केलं.
बेळगाव जिल्ह्यातील अनेक रयत संघटनानी या धरणे आंदोलनात भाग घेऊन प्रखर विरोध केला.या आंदोलनात शेतकरी नेते चिवनाप्पा पूजेरी,प्रकाश नायक,सह इतर नेते सहभागी झाले होते.
बेळगाव तालूका रयत संघटना अध्यक्ष राजू मरवे,भोमेश बिर्जे,तानाजी हलगेकर,प्रितेश होसूरकर यांनी ही सुवर्ण सौधसमोर धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली घोषणा देतेवेळी सुवर्णसौध समोरील रस्त्यावर बसून धरणे धरल्या नंतर पोलिसांनी उचलून आपल्या गाडीत कोंबले आणी मुख्यमंत्री येऊन जाईस्तोवर आपली सुटका नाही म्हणून बजावत बागेवाडी पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केलं.
मुख्यमंत्र्यांनी घेतलं निवेदन
दरम्यान बेळगाव विमान तळावर दाखल होताच मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा यांना शेतकरी नेत्यांनी भेट देत वरील मागण्या पूर्ण करा अश्या आशयाचे निवेदन दिलं. यावेळी गृहमंत्री बसवराज बोंम्मई,राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी आदी उपस्थित होते.