दहावीची परीक्षा जुलैमध्ये होणार असून परीक्षा कशी घ्यायची याविषयी शिक्षण खात्याकडून सूचना आल्या आहेत.परीक्षेसाठी कोरोना नियमावलीचे पालन करावे लागणार आहे.प्रतेक परीक्षा केंद्राचे निर्जंतुकीकरण केले जाणार असून विद्यार्थ्यांना मास्क दिले जाणार आहेत.
दहावीची परीक्षा सी ई टी परीक्षेच्या धर्तीवर घेतली जाणार आहे.जिल्ह्यात 415 परीक्षा केंद्रे असणार आहेत.परीक्षेसाठी दिल्या जाणाऱ्या ओ एम आर शिटचा नुमना प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात आला आहे.
परीक्षेसाठी तयारी देखील करून घेतली जात असून मॉडेल प्रश्नपत्रिका दहावीच्या विद्यार्थ्यांना दिल्या आहेत.त्याचे की अन्सर देखील विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत.की अन्सर वरून विद्यार्थी स्वतःच आपण सोडवल्या मॉडेल पेपरची तपासणी करून किती गुण मिळतात हे पाहू शकतात.
महाराष्ट्रातून पाचशे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला येणार आहेत.महाराष्ट्रातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.त्यांना आणण्यासाठी परिवहन महामंडळाची बस सेवा असणार आहे.परीक्षेसाठी नेमण्यात आलेल्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे.
पन्नास टक्के कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली असून उर्वरित पन्नास टक्के कर्मचाऱ्यांना लवकरच लस देण्यात येणार आहे. कोरोना लक्षणे असलेल्या कर्मचाऱ्याची टेस्ट करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ यांनी दिली.