या वर्षातील खरीप हंगामासाठी हवामानावर आधारित पीक विमा योजना व कर्नाटक रयत सुरक्षा योजनेअंतर्गत विमा योजना जारी करण्यात आली असल्याची माहिती फलोत्पादन खात्याच्या उपसंचालक रवींद्र हकाटी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
कर्नाटक राज्यात सुरक्षा प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत बेळगाव जिल्ह्यासाठी हळद, बटाटा, टोमॅटो, कांदा (पाण्यावर अवलंबून), कांदा (पावसावर अवलंबून) आणि कोबी पिकासाठी विमा उतरविता येणार आहे.
कोबी पिकावर विमा उतरविण्यासाठी 15 जुलै व उर्वरित पिकांसाठी 31 जुलै ही अखेरची तारीख आहे. या पिकांसाठी प्रति हेक्टरी अनुक्रमे 6650 रु., 1337 रु., 5334 रु., 3750 रु., 3500 रु. व 1430 रुपये हप्ता असेल.
हवामानावर आधारित पीक विमा योजनेअंतर्गत द्राक्ष, डाळिंबे आणि ओली मिरची या पिकांसाठी विमा उतरविता येणार आहे. द्राक्ष, डाळिंब व ओली मिरची पिकासाठी प्रति ॲक्टरस अनुक्रमे 14000 रु., 6350 रु. आणि 3550 रुपये हप्ता निश्चित करण्यात आला आहे
सदर पिक विमा योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी बेळगाव 0831 -2431559, गोकाक 08332 -229382, खानापूर 08336 -223387, सौंदत्ती 08330 -222082, अथणी 08289 -285099, रामदुर्ग 08335 -241512,
रायबाग 08330 -225049, हुक्केरी 08333 -265915, चिक्कोडी 08338 -274943 आणि बैलहोंगल 08288 -233758 या दूरध्वनी क्रमांकावर विभाग अथवा तालुकास्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन फलोत्पादन खात्याचे उपसंचालक रवींद्र हकाटी यांनी केले आहे.