कोरोनामुळे मरण पावलेल्या अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती आणि अन्य मागास वर्गातील कुटुंबियांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत आणि कर्ज पुरवठा केला जाणार आहे .कुटुंबियांना रु. 5 लाखापर्यंत मदत मिळणार आहे .रु 4 लाख रुपयाचे कर्ज 6 टक्के व्याज दराने तर रु.1 लाख रुपयाचा मदत निधी मिळणार आहे .
पात्र कुटुंबियांना 24 जूनच्या आत आवश्यक दाखले आणि कागदपत्रे सादर करावीत ,असे आवाहन जिल्हाधिकारी एम.जी .हिरेमठ यांनी केले आहे.
कर्ता पुरुष मृत्युमुखी पडला असल्यास कुटुंबीयांना मदत मिळणार आहे. यासाठी जात व उत्पन्नाचा दाखला, मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र ,शिधापत्रिका ,आधार कार्ड, वारसदरचे आधार कार्ड ,आरटीपीसीआर अहवाल, कोरोनामुळे मृत्युमुखी पडल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र 24 जूनच्या आत संबंधित खात्याच्या कार्यालयात द्यावेत ,असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
अनुसूचित जाती मधील कुटुंबियांनी आणि आपली कागदपत्रे जिल्हा व्यवस्थापक ,डॉ .बी .आर .आंबेडकर विकास महामंडळ बेळगाव, सुवर्णसौध,खोली क्र 123, हलगा, बेळगाव-590020 या पत्यावर पाठवावी .तर अनुसूचित जामातीमधील कुटुंबियांनी जिल्हा व्यवस्थापक, श्री महर्षी वाल्मिकी विकास महामंडळ ,सुवर्णसौध खोली क्र.222,हलगा, बेळगाव -590020 या पत्त्यावर पाठवावीत.
अन्य मागासवर्गीय कुटुंबियांनी जिल्हा व्यवस्थापक , दि .देवराज अर्स विकास महामंडळ ,सुवर्णसौध तळमजला ,हलगा,बेळगाव 590020 या पत्यावर पाठवावे . मृत व्यक्तीचे वय 18 ते 60 पर्यंत असावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाखापर्यंत असावे.कोरोनामुळे मृत्यू झाल्यावर वैद्यकीय प्रमाणपत्र आणि मृत्यू प्रमाणपत्र असावे, असे जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी कळविले आहे.