बेळगाव हा सीमावर्तीय जिल्हा असल्यामुळे येथील लाॅक डाऊनचा कालावधी वाढविणे गरजेचे आहे आणि हा मुद्दा आपण उद्या आयोजित केलेल्या बैठकीप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत, असे जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी आज स्पष्ट केले.
बेळगावला आज दिलेल्या भेटीप्रसंगी बोलताना जिल्हा पालकमंत्री कारजोळ यांनी वरीलप्रमाणे आपले मत व्यक्त करण्याबरोबरच चिकोडी येथील आरटी -पीसीआर प्रयोगशाळा स्थापण्याचे कार्य जलद गतीने झाले पाहिजे असे सांगून दोन दिवसात सदर प्रयोगशाळा सुरू करण्याची सूचना त्यांनी दिली.
त्याचप्रमाणे त्यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. बेळगाव हा सीमावर्ती जिल्हा असल्यामुळे विजयापुरा, बागलकोट आणि कलबुर्गीप्रमाणे या ठिकाणी देखील विशेष काळजी घेण्याची गरज आहे, असेही मंत्री कारजोळ यांनी स्पष्ट केले.
बुधवार 9 जून बेळगाव जिल्हा कोविड मेडिकल रिपोर्ट-नवीन पोजिटिव्ह रुग्ण 341, डिस्चार्ज रुग्णांची संख्या 1097 एकूण सक्रिय रुग्ण संख्या 8100 – बुधवारी कोरोनाचे 8 बळी- एकूण बळी 663