Monday, December 30, 2024

/

वीकेंड कर्फ्यू …काय सुरू?… काय बंद?

 belgaum

राज्यात अनलॉक जारी झाला असला तरी आज शुक्रवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून सोमवार दि. 28 जून रोजी सकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यात वीकेंड कर्फ्यू लागू होणार आहे. या कर्फ्यू दरम्यान आपत्कालीन आणि जीवनावश्यक सेवा वगळता नागरिकांच्या वर्दळीवर पूर्णपणे बंदी असणार आहे.

वीकेंड कर्फ्यु दरम्यान सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अन्नपदार्थांशी संबंधित दुकाने, फळे आणि भाजीपाला दुकाने, मटन आणि माशाची दुकाने, दूध डेअरी आणि दूध विक्री केंद्रं, तसेच गुरांचा चारा या सर्व गोष्टींना परवानगी असणार आहे. याव्यतिरिक्त अन्य सर्व दुकाने सप्ताहाअखेर बंद राहतील. स्वतंत्र दारू दुकाने आणि औटलेट्स (टेकअवे पद्धतीने) सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत खुली राहतील. उपाहारगृहे आणि खानावळी टेकअवे पद्धतीचा अवलंब करून तसेच घरपोच सेवेसाठी सुरू ठेवण्यास मुभा असेल.

राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांची आपत्कालीन सेवा, जीवनावश्यक सेवा आणि कोरोना संदर्भातील व्यवस्थापन सेवा पूर्ण क्षमतेने सुरू राहील. त्यामुळे सरकारी अधिकारी आणि व्यक्तींना वीकेंड कर्फ्यू काळात संचाराची परवानगी असेल. आपत्कालीन आणि जीवनावश्यक सेवेशी निगडित सर्व उद्योगधंदे कंपन्या आणि संघटना यांना कोरोना नियमावलीचे पालन करून कार्यरत राहण्यास मुभा असेल. या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे सार्वजनिक ठिकाणी संचारासाठी आपल्या कंपनीचे अधिकृत ओळखपत्र असणे गरजेचे आहे. तथापि संबंधित उद्योग धंदे कंपन्या आणि संघटनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना शक्यतो घरातूनच काम करण्यास प्रोत्साहित करावे. अधिकृत ओळखपत्रासह टेलिकॉम आणि इंटरनेट सेवेशी निगडित कर्मचाऱ्यांना संचाराची परवानगी असेल. आयटी आणि आयटीइएस कंपन्यांच्या फक्त आवश्यक कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येऊन काम करावे उर्वरित आणि घरातूनच कार्यालयीन काम करावे.

किमान पुरावा दाखवून रुग्ण वाहतूक आणि लसीकरणात जाण्यास परवानगी असेल. वीकेंड कर्फ्यु दरम्यान सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अन्नपदार्थांची संबंधित दुकाने, फळे आणि भाजीपाला दुकाने, मटन आणि माशाची दुकाने, दूध डेअरी आणि दूध विक्री केंद्र तसेच गुरांचा चारा या सर्व गोष्टींना परवानगी असणार आहे. रस्त्यावरील विक्रेत्यांना सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आपला व्यवसाय करता येईल. सार्वजनिक वितरण व्यवस्थेची दुकाने सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास अनुमती असेल. स्वतंत्र दारू दुकाने आणि औटलेट्स टेकअवे पद्धतीने सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत खुली राहतील. त्याचप्रमाणे नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी सर्व प्रकारच्या साहित्याच्या घरपोच सेवेस 24 तास परवानगी असणार आहे. उपाहारगृहे आणि खानावळ फक्त टेकअवे आणि घरपोच सेवा या पद्धतीने सुरू राहतील.

बस, रेल्वे आणि विमान वाहतुकीस परवानगी असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना बस स्थानक, रेल्वे स्थानक किंवा विमानतळापर्यंत ने-आण करण्याची खाजगी प्रवासी वाहनांना मुभा असणार आहे. मात्र त्यासाठी प्रवाशांकडे प्रवासाचे तिकीट किंवा वैध प्रवासी कागदपत्रे असणे अनिवार्य आहे. लग्न समारंभ जास्तीत जास्त 40 लोकांच्या उपस्थितीत घरच्या घरी कोरोनाचे नियम पाळून करण्यास परवानगी असेल. अंत्यसंस्कार किंवा दफन विधी जास्तीत जास्त 5 लोकांच्या उपस्थितीत कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून पार पाडले जावेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.