सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याच्या आरोपावरून मच्छे येथील मराठी भाषिक युवकांना मारहाण केलेले ते तीन पोलीस कॉन्स्टेबल निलंबित झाले आहेत.पोलीस आयुक्त डॉ त्यागराजन तसा निलंबनांचा आदेश बजावला आहे.
गेल्या मार्च महिन्यात सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट घातल्याच्या आरोपाखाली ग्रामीण पोलिसांनी मच्छे येथील दोघा युवकांना ताब्यात घेतलं होतं.गोविंद पुजारी,नारायण चिप्पलकट्टी आणि चन्नप्पा हुनश्याळ अशी निलंबित झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलांची नाव आहेत.
मराठी आणि कन्नड भाषिकातील सौहार्दता नष्ट केल्याचा आरोप करत दोन युवकांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यावेळी युवकांना पोलिसांनी मारहाण केल्याची बाब समोर आली होती त्या दरम्यान पोलीस स्थानकातील सी सी टी व्ही फुटेज आणि सदर युवकांच्या पाठीवरील जखम पाहून पोलिसांना निलंबित केलं आहे असे स्पष्टीकरण पोलीस आयुक्त त्यागराजन यांनी दिलं आहे.
अशी घडली होती घटना
मार्च महिन्यात कोल्हापूर महालक्ष्मी मन्दिर परिसरातील कन्नड फलकांना काळ फासण्यात आलं होतं त्या नंतर कन्नड रक्षण वेदिकेने रामलिंग खिंड गल्लीतील शिवसेना कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्ट नंतर या युवकांना ग्रामीण पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस स्थानकात बोलावले होते.
ग्रामीण पोलीस स्थानक उपनिरीक्षक यांनी विशाल छापरे, दिगंबर डेलेकर आणि निखिल केसरकर या तिघांवर कारवाई करत ग्रामीण पोलीस स्थानकात बोलावले होते.त्या चौकशी दरम्यान पोलिसांनी या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांना मारहाण झाली होती त्याचे पडसद दिल्ली पर्यंत उमटले होते.खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत यावर आवाज उठवला होता.
दरम्यान बेळगाव पोलीस आयुक्त त्यागराजन यांनी तीन पोलीस कॉन्स्टेबलना निलंबित करत कर्नाटक पोलीस कारवाई करण्यात दुजाभाव करत नाहीत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
एकीकडे पोलीस आयुक्तांनी मराठी युवकांना मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित केलंय तर दुसरीकडे पुन्हा कन्नड संघटनांनी कुलहेकुई करत पोलिसांवरील निलंबनांची कारवाई मागे घ्यावी अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.