मान्सून लवकरच सक्रिय होण्याचे संकेत असल्यामुळे संभाव्य अतिवृष्टी व पूरपरिस्थितीची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी पूर्व तयारी सुरू केली आहे. त्यासाठी जिल्ह्यात 500 निवारा केंद्रांची स्थापना करण्यात येणार असून तालुकानिहाय नोडल अधिकारी नियुक्ती बाबत आदेश जारी करण्यात आला आहे.
मागील दोन वर्षापासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. मागील काही वर्षातील अनुभव लक्षात घेता दोन आठवड्यापासून जिल्हा प्रशासनाने तयारीला सुरुवात केली आहे. येत्या एक किंवा दोन आठवड्यात मान्सून सक्रिय होण्याचे संकेत असून या काळात अतिवृष्टी पूर किंवा महापूर आल्यास आवश्यक खबरदारी घेण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.
तसेच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मिळून 500 गावांना पुराची झळ पोहोचण्याची भीती असून येथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी 500 निवारा केंद्रं स्थापण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरवर्षी 100 पेक्षा कमी निवारा केंद्राची स्थापना केली जाते. परंतु यंदा कोरण्याचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पूरग्रस्त दाटीवाटीने राहिलास हा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. त्यासाठी निवारा केंद्रांची संख्या वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरवर्षी वैद्यकीय पथकावर संसर्गजन्य आजार पसरणार नाहीत याची खबरदारी घेण्याची जबाबदारी असते. परंतु यावेळी कोरोना प्रादुर्भाव असल्यामुळे केंद्रात वास्तव्याला येणाऱ्यांची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.
त्यासाठी वैद्यकीय पथके वाढवली जातील. तसेच रोगाची लक्षणे दिसल्यास संबंधितास त्वरित कोविड केअर किंवा कोविड उपचार केंद्रात दाखल केले जाईल अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. शिवाय निवारा केंद्रात आश्रयास येणाऱ्या प्रत्येकाला मास्क व सॅनिटायझर पुरविण्याचे नियोजन आहे.