जर दररोज 21 हजार 312 नागरिकांचे लसीकरण झाल्यास बेळगाव जिल्ह्यातील 54,23,161 इतक्या संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण करण्यासाठी 1 वर्ष 2 महिने आणि 19 दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे बेंगलोरच्या इकोनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक्स डायरेक्टरेटने स्पष्ट केले आहे.
दरम्यान बेळगाव कोविड-19 व्हॅक्सीन ट्रॅकरनुसार आज मंगळवारी 29 जून रोजी दुपारी 3:28 वाजेपर्यंत जिल्ह्यातील 6,623 जणांना कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आला. काल संपूर्ण दिवसाची ही आकडेवारी एकूण 61,415 इतकी होती. आज दुपारपर्यंत लसीकरण झालेल्यांमध्ये 5,826 जणांनी पहिला डोस तर 797 जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला. आतापर्यंत जिल्ह्यातील लोकसंख्येच्या 22 टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे, म्हणजे लसीचे एकूण 1,196,408 इतके डोस देण्यात आले आहेत. यापैकी 19 टक्के नागरिकांनी म्हणजे 1,022,179 जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्याचप्रमाणे पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 174,229 इतकी आहे. ही आकडेवारी पाहता मागील सात दिवसात दररोज सरासरी 21 31 2 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
लसीकरणात सर्वोत्तम कामगिरी बजावणाऱ्या जिल्ह्यातील दहा लसीकरण केंद्रांचा तपशील (अनुक्रमे केंद्राचे नांव, आजचे लसीकरण, पहिला डोस घेतलेल्यांची एकूण संख्या, दुसरा डोस घेतलेल्याची एकूण संख्या या क्रमाने) पुढील प्रमाणे आहे. जनरल हॉस्पिटल चिक्कोडी : 399, 1421, 472. बैलहोंगल जीएच (18 ते 44 वयोगट) : 351, 652, 1. संकेश्वर वर्कप्लेस हुक्केरी : 294, 3158, 0. हुक्केरी जीएच कोव्हॅक्सीन : 279, 2335, 646. किणये पीएचसी : 254, 4183, 1258. रामदुर्ग जीएच कोव्हॅक्सीन 18 : 252, 2180, 1. सौंदत्ती जीएच एफएलडब्ल्यू : 230, 2942, 400. कणकुंबी पीएचसी कोव्हॅक्सीन : 229, 593, 117. बेळगुंदी पीएचसी : 215, 2032 192. उचगाव पीएचसी 1 : 208, 4357, 853. दरम्यान, काल सोमवारी 28 जून रोजी जिल्ह्यातील 55 हजार 293 जणांना पहिला डोस तर 6122 जणांना कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस या पद्धतीने एकूण 61 हजार 415 जणांचे लसीकरण झाले.