Friday, December 27, 2024

/

तिसरी लाट रोखण्यासाठी कठोर उपाय योजना : जिल्हाधिकारी

 belgaum

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्यांदा त्याची चर्चा सध्या सुरू आहे. बेळगाव जिल्ह्यातही कांही बालकांसह युवकांमध्ये तशी लक्षणे आढळून येत असल्याने जिल्हा प्रशासनाने आत्तापासूनच खबरदारीची उपाय योजना हाती घेतली आहे. त्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तात्काळ उपचार उपलब्ध करून देण्यासाठी 171 बेड्सची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी नुकतीच दिली.

जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा फैलाव होऊ नये, यासाठी कठोर उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सीमेवर ठीकठिकाणी चेक पोस्ट निर्माण करण्यात आले आहे. त्या ठिकाणी महाराष्ट्रातून येणाऱ्यांची चौकशी व तपासणी करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातून बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे. संभाव्य तिसरी लाट येण्याच्या शक्यतेने जिल्ह्यासाठी 121 तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. रुग्ण संख्येत वाढ होऊन गरज पडल्यास विविध खाजगी हॉस्पिटल्समधील डॉक्टरांची मदत देखील घेण्याची तयारी करण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

M g hiremath dc
M g hiremath dc

लाॅक डाऊनमुळे अनेक जणांना आपले उद्योग-व्यवसाय बंद करावे लागले आहेत. राज्य सरकारने अशा घटकांच्या मदतीसाठी विशेष आर्थिक पॅकेज घोषित केले आहे. त्यासाठी पात्र लाभार्थीकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

आर्थिक सहाय्य त्यांच्या बँक खात्यात थेट जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती देऊन जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. तेव्हा 45 वर्षे वयावरील सर्वांनी न चुकता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.