लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांवर सोमवारी रात्री काही अज्ञात टवाळखोरांनी हल्ला केल्याची खळबळजनक घटना दरबार गल्ली परिसरात घडली त्यामुळे या भागांत काही काळ तणाव निर्माण झाला होता.
या घटनेत हल्ल्यात एक पोलिस जखमी झाला असून पोलिसांवर हल्ला करून पसार झालेल्या त्या अज्ञात हल्लेखोरांचा शोध मार्केट पोलीस घेत आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून पोलीस रात्रंदिवस ड्यूटी बजावत आहेत अश्या गस्तीवर असलेल्या पोलिसांवर हल्ला करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न विचारला जात आहे.
या घटने बाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार सोमवारी रात्री संवेदनशील भागात चौका चौकात पोलिसांकडून नाकाबंदी सुरू असताना पाच टवाळखोरांनी पोलिसांच्याच हातातील काठी हिसकावून पोलिसांवरच हल्ला केला.
गाडी का थांबवली अशी हुज्जत घालत त्या युवकांनी आपल्या ईतर सहकाऱ्यांना बोलवून पोलिसांवर हल्ला केला यात एक पोलिस जखमी झाला आहे. हल्ला केल्यानंतर ते युवक दुचाकीवरून पसार झाले आहेत. या घटनेमुळे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली असून मार्केटचे ए सी पी पोलिस अधिक्षक या टवाळखोरांचा शोध घेत आहेत.