जमिनीच्या वादातून झालेल्या हल्ल्यात बापाचाही मृत्यू-बेळगाव : सावंगाव येथे जमिनीच्या वादातून झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या बापाचाही आज मृत्यू झाला
नारायण कर्लेकर ( वय 64 ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
सावंगाव येथे जमिनीच्या वादातून जीवघेणा हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात रवींद्र नारायण कर्लेकर या तरुणाचा मृत्यू झाला होता.
तर हल्ल्यात रवींद्रचे वडील नारायण कल्लाप्पा कर्लेकर हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान ते आज दुपारी मरण पावले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून असा परिवार आहे.