Monday, December 23, 2024

/

बेळगाव तालुका पंचायतीवर लवकरच प्रशासकाची नियुक्ती

 belgaum

बेळगाव तालुका पंचायतीचा कार्यकाळ येत्या 26 जून रोजी समाप्त होणार असून ता. पं. निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यामुळे तालुका पंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती केली जाणार आहे.

राज्यातील कार्यकाळ समाप्त होणाऱ्या तालुका पंचायतींवर प्रशासक नियुक्तीचे आदेश ग्रामीण विकास आणि पंचायत राज खात्याने बजावले आहेत. त्यानुसार बेळगाव तालुका पंचायतीला जिल्हा पंचायतीचे उपसचिव किंवा तत्समान अधिकारी प्रशासक म्हणून लाभणार आहेत.

शासनाने बजावलेल्या आदेशात तालुका पंचायतीचा कार्यकाळ समाप्त झाल्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी प्रशासकांकडे तालुका पंचायतीची जबाबदारी सोपविली जाणार आहे. बेळगाव तालुका पंचायतीचा कार्यकाल 26 जून रोजी समाप्त होणार असून 27 जून रोजी प्रशासकांनी सूत्रे हाती घेणे अपेक्षित आहे.

मात्र त्यादिवशी रविवारची साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे बेळगाव तालुका पंचायतीला 28 जून रोजी प्रशासक लाभणार आहेत.

बेळगाव जिल्ह्यात 14 तालुके असून यापैकी 7 तालुका पंचायतींचा कार्यकाळ समाप्त झाला आहे. त्याठिकाणी प्रशासकही नियुक्त करण्यात आले आहेत . जिल्ह्यात अथणी, कागवाड, बैलहोंगल, कित्तूर, चिक्कोडी व रायबाग या तालुका पंचायत यांचा कार्यकाळ मे महिन्यात समाप्त झाला आहे.

उर्वरित तालुका पंचायतींचा कार्यकाळ समाप्त होण्याच्या तारखा पुढील प्रमाणे आहेत. बेळगाव ता. पं. : 26 जून 2021, सौंदत्ती ता. पं. : 5 सप्टेंबर 2021, खानापूर ता. पं. : 5 ऑक्टोबर 2021, रामदुर्ग ता. पं. : 5 नोव्हेंबर 2021, हुक्केरी ता. पं. : 5 डिसेंबर 2021, गोकाक ता. पं. : 5 डिसेंबर 2021 आणि मुडलगी ता. पं. : 5 डिसेंबर 2021.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.