कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कारिटस इंडिया, नवी दिल्ली आणि बेळगाव डायोसीस सोशल सर्व्हीस सोसायटीतर्फे (बीडीएसएसएस) बीम्स हॉस्पिटलला 25 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स देणगी दाखल देण्यात आले.
बिम्स हॉस्पिटल येथे काल मंगळवारी हा कार्यक्रम पार पडला. बेळगाव डायोसीस सोशल सर्व्हीस सोसायटीचे अध्यक्ष बिशप डेरेक फर्नांडिस यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स प्रादेशिक आयुक्त आणि बीम्सचे प्रशासक आदित्य आमलान बिश्वास यांच्याकडे सुपूर्द केले.
प्रशासक बिश्वास यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बेळगाव डायलिसिस सोशल सर्व्हीस सोसायटीने कॉन्सन्ट्रेटर्स देऊन मदतीचा हात पुढे केला आहे. याबद्दल प्रशासक आदित्य आमलान बिश्वास यांनी बिशप फर्नांडिस आणि त्यांच्या सहकाऱ्यांची प्रशंसा करून धन्यवाद दिले.
यावेळी बोलताना बिशप डेरेक फर्नांडिस यांनी डॉक्टर्स, नर्सेस तसेच इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. मानवतेसाठी त्यांनी केलेले कार्य सर्वांच्याच कायम लक्षात राहील तसेच बीम्सला देण्यात, आलेले हे साहित्य अनेक गरज गरजू व गरीब लोकांच्या मदतीला येईल असे त्यांनी सांगितले.
कॉन्सन्ट्रेटर्स वितरण कार्यक्रमाप्रसंगी खासदार मंगला अंगडी, आमदार ॲड. अनिल बेनके, बीम्सचे प्रभारी संचालक डॉ. उमेश कुलकर्णी, आफ्रीनबानू सईदा बल्लारी, फादर ईसेबीओ फर्नांडिस आदींसह बेळगाव डायोसिस सोशल सर्व्हीस सोसायटीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.