येळ्ळूर ग्राम पंचायत टास्क फोर्स कमिटी आणि गावकऱ्यांच्या वतीने देखील गावात कडक लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लॉक डाऊनची अमलबजावणी अत्यंत कडकपणे करण्यात येणार आहे.ग्रामस्थांनी कडक लॉक डाऊन पाळण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
मंगळवार दिनांक 18 मे ते सोमवार दिनांक 24 मे पर्यत गावातील सगळे व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.गावातील फक्त दवाखाना व औषध दुकाने दिवसभर चालू राहतील. दुध डेअरी आणि सरकारी रेशन दुकाने सकाळी 6 ते 9 पर्यत चालू राहतील. दूध डेअरी आणि रेशन दुकान येथेही कोरोना नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे.
गावातील इतर सर्व दुकाने बंद राहतील. जनतेने घराबाहेर पडू नये जर विनाकारण घराबाहेर मोटार सायकल घेऊन फिरल्यास वाहन जप्त करण्यात येईल.
विना मास्क फिरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने “गाव बंद” चा निर्णय घेण्यात आला.घरीच राहा सुरक्षित राहा असा संदेश ग्राम पंचायत टास्क फोर्स कमिटी अध्यक्ष सतिश पाटील , पी.डी.ओ अरुण नाईक आणि ग्राम पंचायत सदस्याच्या वतिने करण्यात आले आहे.