संशयित कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समजताच गावकऱ्यांनी वाळीत टाकून गावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास विरोध केल्यामुळे हेल्प फॉर नीडी या संघटनेने एका मृत व्यक्तीवर वडगांव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केल्याची घटना काल सोमवार रात्री घडली.
याबाबतची माहिती अशी की, खमकारहट्टी (ता. बेळगाव) येथील एका कोरोनाग्रस्त रुग्णाला उपचारासाठी शहापूर महात्मा फुले रोड येथील व्हीनस हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. उपचाराअंती संबंधित रुग्णाला घरी नेण्यात आले. मात्र देवाने त्यानंतर अवघ्या दोन तासात संबंधित रुग्णाचा मृत्यू झाला.
संशयित कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समजताच खमकारहट्टी गावकऱ्यांनी संबंधित व्यक्तीवर गावाच्या हद्दीत अंत्यसंस्कार करण्यास मनाई केली. परिणामी मृत व्यक्तीचे कुटुंबीय असहाय्य झाले होते याबाबतची माहिती मिळताच हेल्प फॉर निडीचे प्रमुख सुरेंद्र अनगोळकर यांनी आपल्या सहकार्यांसह खमकारहट्टी येथे धाव घेतली. तसेच मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी बेळगाव परिसरात प्रयत्न केले.
सध्या बेळगाव शहरातील सदाशिवनगर स्मशानभुमीमध्ये कोरोनाग्रस्त व्यतिरिक्त रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शहापूर येथील स्मशानभूमीमध्ये अनगोळकर यांनी प्रयत्न केले. परंतु तेथे देखील जागा नसल्यामुळे अखेर वडगांव येथील स्मशानभूमीमध्ये संबंधित व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अतिशय अमानवीय घटना आहे ही… विरोध करणाऱ्याना व गावातील पुढारी म्हणवून घेणार्यांना सर्वाना अटक करून दंड करण्यात आला पाहिजे