बेळगाव जिल्ह्यात ब्लॅक फंगसने दोघा जणांचा बळी घेतला असून जिल्ह्यातील अन्य सात जणांना ब्लॅक पंकजचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी शशिकांत मुन्याळ यांनी दिली आहे.
ब्लॅक फंगस झालेल्या 7 जणांसह व्हाईट फंगस झालेले 2 रुग्ण जिल्ह्यात आढळून आले आहेत. हे सर्वजण कोरोनातून बरे झालेले रुग्ण आहेत.
ब्लॅक फंगसमुळे मृत्युमुखी पडलेल्यांपैकी एक जण अथणी आणि दुसरा गोकाक येथील असून हे दोघेही 70 वर्षे वयावरील आहेत, असेही मुन्याळ यांनी स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे ब्लॅक फंगसचा हा संसर्ग ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटरमधील ह्युमिडिफायरमध्ये वापरण्यात आलेले अशुद्ध पाणी आणि अस्वच्छ किंवा संसर्गजन्य फेस मास्कमुळे झाला असावा, असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे.