कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग मोठे प्रयत्न करत आहेत. मात्र नागरिकांच्या दुर्लक्ष पणामुळे कोरोना वाढतच चालला आहे जिल्हाधिकार्यांनी 48 तासाचा कडक विकेंड लॉक डाऊन केला होता. त्यामुळे नागरिक घरातच होते.
मात्र मंगळवारी पुन्हा नागरिकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. दरम्यान 48 तासाचा लॉकडाऊन झाला असला तरी तीन दिवस अशी माहिती देण्यात आल्याने सोमवारी बाजारपेठेत गर्दी कमी होती. मात्र मंगळवारी बेळगाव बाजार पेट बंद ठेवण्यात येते. मात्र कोरोनामुळे मंगळवारीही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी दिसून आली.
नागरिकांनी एकच गर्दी केल्यामुळे पोलिसांनी तातडीने दुकाने बंद करण्यास सुरुवात केली होती. कोरोना महामारी मुळे संपूर्ण देश झुंजत असताना अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करून हा विषाणू वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत का असा प्रश्नही जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
बेळगाव शहरातील अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आले असले तरी नागरिक मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करत आहेत. मंगळवारी भाजी फळे तसेच धान्य खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. गणपत गल्ली कांदा मार्केट नरगुंदकर भावे चौक शनी मंदिर काकती वेस रोड कलमठ रोड शिवाजी उद्यान रोड खडेबाजार शहापूर बाजार गल्ली वडगाव आणि इतर ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने समस्या निर्माण झाली.
एपीएमसी मार्केट ही दोन दिवसापासून बंद असल्याने त्या ठिकाणी गर्दी पहावयास मिळाली. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी गर्दी करू नये असे आवाहन करतानाचे चित्र दिसत होते. या गर्दीमुळे लवकरच बाजारपेठ बंद करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.