रिक्षा, मॅक्सी कॅब चालकांना 3000 रु. : सरकारचे पॅकेज जाहीर-राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्यामुळे 24 मेपर्यंत लॉक डाऊनचा निर्णय घेण्यात आला असला तरी आता हा कालावधी वाढविण्याचा बाबतचा निर्णय 23 मे रोजी घेण्यात येणार आहे.
दरम्यान राज्य शासनाने 1250 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली असून त्याद्वारे ऑटो रिक्षा व मॅक्सी कॅब चालक, असंघटित कामगारांसह इतरांना आर्थिक मदतीचा दिलासा दिला आहे.
राज्यातील वाढता कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने 1250 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. या पॅकेजद्वारे ऑटोरिक्षा आणि मॅक्सी कॅब चालकांना 3000 रुपये, कलाकारांना 3000 रुपये, श्रमिक कामगारांना 3000 रुपये, फुलं -फळं उत्पादकांना प्रति हेक्टर 10000 रुपये, बांधकाम कामगारांना 3000 रुपये, रस्त्याकडेला व्यापार करणाऱ्यांना 2000 रुपये तसेच केशभूषा करणारे, धोबी, टेलर, हमाल, कचरा, उचलणारे, कुंभार भट्टी कामगार, सोनार कामगार, मेकॅनिक, गृह कामगार आदी असंघटित कामगारांना 2000 रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे.
रेशनवर बीपीएल कार्डधारकांना मोफत आणि एपीएल कार्डधारकांना 15 रु. किलो प्रमाणे 5 किलो तांदूळ. बेंगलोर बीपीएमपी भागात मोफत जेवण. शिक्षक, गॅस सिलेंडर डिलिव्हरी बॉईज यांना फ्रन्टलाइन कोरोना वाॅरियर्सचा दर्जा. लॉक डाऊन लागू केल्याने बेंगलोर यासारख्या शहरात कोरोना रुग्ण वाढीला ब्रेक लागला असून कोरोना बाधित रुग्णांपेक्षा कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे.
त्यामुळे आता राज्यातील इतर भागातील कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठी सध्याच्या कठोर निर्बंधांचा कालावधी आणखी वाढवण्याचा निर्णय 23 मे ला घेण्यात येणार आहे.