बेळगाव बिम्स मध्ये प्रचंड गैरसोयी आहेत. यासाठी बिम्स चा कारभार लवकरात लवकर सुधारा अशी मागणी भाजप नेते किरण जाधव यांनी जिल्हाधिकारी के हरिशकुमार यांच्याकडे केली आहे.
आज त्यांनी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली व बिम्स मध्ये येत असलेल्या समस्यांचा आढावा घेतला.
बिम्स हे सर्व रुग्णांना सहारा व्हायला हवे पण तिथे सुरक्षित वातावरण नाही आणि सोयी पण मिळत नाहीत यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली.
याकडे लक्ष घालून वेळीच सुधारणा करू असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. यावेळी त्यांना एक निवेदनही देण्यात आले आहे.