जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा नाही म्हणून सांगत असले तरी वास्तव मात्र वेगळेच आहे .जिल्हा रुग्णालयात परिस्थिती भयानक असून तेथे ऑक्सिजनचा तुटवडा आहे असे जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक दंडगी यांनी सांगितले आहे.यामुळे खोट्या माहिती देऊन स्वतः खोटे श्रेय लाटणाऱ्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे.
जनतेच्या अनेक तक्रारी आल्यामुळे समितीचे कार्यकर्ते मदन बामणे यांनी थेट वैद्यकीय अधीक्षकांना फोन करून जनतेला भेडसावत असलेल्या समस्या आणि रुग्णाची होत असलेली हेळसांड या बाबत सांगितले.
त्यावेळी वैद्यकीय अधीक्षकांनी जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचे कबूल केले.मदन बामणे यांचा बिम्स अधिकाऱ्यां सोबत संवाद केलेल्या आवाजाचीफित सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
व्हायरल झालेल्या आवाजात जिल्हा रुग्णालयात रुग्णांना दाखल करून घेणे अवघड असल्याची कबुली त्यांनी दिली.
त्यामुळे जिल्ह्यातील जनते बाबत लोक प्रतिनिधी,मंत्री आणि अधिकारी यांना काहीच देणे घेणे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. फक्त फुकटच्या खोट्या गोष्टी सांगून लोकप्रतिनिधी वेळ काढत आहेत असा आरोप मदन बामणे यांनी केला आहे.
बेळगाव जिल्ह्यात कोरोना ने उत्पात माजवला असून दररोज असंख्य रुग्णांचा योग्य उपचारांविना मृत्यू होत आहे. दरम्यान मृत्यूची संख्या घटण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यापेक्षा जिल्हा प्रशासनाने केवळ आश्वासन देत दिवस ढकलले जात आहेत याबद्दल जनतेत नाराजी आहे.