Wednesday, January 22, 2025

/

*युवासेनेच्या उपक्रमाला शिवसेनेकडून मोलाची मदत*

 belgaum

एक हात आपलूकीचा या बेळगावातील युवा सेनेच्या युवकांनी चालवलेल्या उपक्रमाला शिवसेनेने मोलाची मदत देऊ केली.गेल्या कित्येक दिवसांपासून लॉकडाऊन काळात दररोज रात्री अडीशे हून अधिक गरजूना पार्सल भोजनाची सोय करण्यात येत आहे.

लोकवर्गणीतून युवकांनी चालवलेल्या या उपक्रमास समाजातून हातभार लागत आहे याची दखल घेत बेळगाव शिवसेनेने देखील या युवकांना मदत दिली.

मंगळवारी दुपारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन चाललेल्या कार्याची प्रशंसा केली व या कार्यासाठी आर्थिक मदत व साहित्य उपलब्ध करून दिले.Yuva sena

या वेळी बेळगाव जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, संपर्कप्रमुख अरविंद नागणुरी, जिल्हा संघटक दत्त जाधव, शहर प्रमुख दिलीप बैलूरकर, उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, प्रवीण तेजम, राजकुमार बोकडे, राजू तुडयेकर, प्रकाश राऊत, विभागप्रमुख नारायण मसरकर उपस्थित होते.

या वेळी युवासेना बेळगाव चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी युवासेने तर्फे महेश मजुकर व संकेत लोहार यांनी आभार व्यक्त केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.