यमकनमर्डी मतदार संघ आणि बेळगाव तालुक्यातील कोरोना वॉरियर्सना आमदार सतीश जारकीहोळी यांच्या मार्फत सॅनीटायझर, फेसमास्क आणि पीपीई कीट वितरण करण्याचा कार्यक्रम गोकाक हिल गार्डन येथील कार्यालयात पार पडला.
सतीश शुगर्स आणि सतीश जारकीहोळी फाउंडेशनतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी कार्यरत सर्व कोरोना वॉरियर्स धन्यवाद देण्यात आले.
सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थिती आमचे कार्यकर्ते विविध प्रकारे समाज सेवा करत आहे. यासाठी गोकाक तालुक्यातील कोरोना वॉरियर्सना नुकतेच सॅनीटायझर आणि फेसमास्कचे वितरण करण्यात आले आहे.
आता यमकनमर्डी मतदार संघ आणि बेळगाव तालुक्यातील कोरोना वाॅरियर्सना सॅनीटायझर व फेसमास्क देत आहोत. याखेरीज सद्यपरिस्थितीत गरजूंना सर्वतोपरी सहाय्य केले जाईल, असे यावेळी बोलताना केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
अद्याप एकूण 2000 फेस मास्क आणि 2500 सॅनीटायझर्सचे वाटप करावयाचे बाकी आहे. त्याचप्रमाणे गरजू कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी 40 ऑक्सीजन सिलेंडर्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. बऱ्याच जणांवर हॉस्पिटल आणि कोरोना केअर सेंटरमध्ये जागा न मिळाल्याने त्यांच्यावर घरातच उपचार सुरू आहेत. अशा रुग्णांना आवश्यकता भासल्यास ऑक्सिजन सिलेंडर पुरवले जाणार आहेत, असेही आमदार सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.