कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता गावागावात रॅपिड अंटीजन टेस्ट करण्यात येणार आहे. यासाठीची चालना जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी लवकरच दिली असून आता सध्या जिल्ह्यातील 135 गावांमध्ये ही टेस्ट सुरू करण्यात आली आहे तर उर्वरित गावांमध्ये ही लवकरच याबाबत पावले उचलण्यात येणार आहेत.
बेळगाव तालुक्यातील हिंडलगा व इतर ठिकाणीही या रॅपिड टेस्ट ला चालना देण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे कोरोनावर मात करण्यासाठी आणि थोपवण्यासाठी या टेस्टच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत.
सोमवार दिनांक 24 रोजी 135 गावांमध्ये तपासणीला चालना देण्यात आली आहे तर ज्यांना लक्षणे आढळत आहेत त्यांना होम केअर मध्ये ठेवण्यात येणार आहेत. याचबरोबर इतर लक्षणे आढळल्यास त्यांच्यावर रॅबिट अँटीजन टेस्ट करून त्यानंतर rt-pcr टेस्ट करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक गावात एका नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात सक्रिय असलेल्या टास्कफोर्सच्या माध्यमातून ही तपासणी करण्यात येत आहे.
फैलाव वेगाने वाढतो आहे. त्याला आळा घालण्यासाठी कोरोना चाचणीला वेग देण्यात येणार आहे. यापुढे आता प्रत्येक गावागावात रॅपिड अंटीजन टेस्ट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
बेळगाव जिल्ह्यात आतापर्यंत एकशे पस्तीस गावांमध्ये या चाचणीला चालना देण्यात आली असून याचे उद्घाटन जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना त्यांनी सूचनाही केल्या आहेत.