कर्नाटकात कोरोना संक्रमण वाढत असल्याने बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.प्राथमिक आणि प्रौढ शिक्षण खात्याचे मंत्री सुरेशकुमार यांनी ही माहिती दिली.
दि.२४ मे पासून बारावीची परीक्षा सुरू होणार होती.विधान सौध मध्ये शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी ची बैठक मंत्री सुरेशकुमार यांनी घेतल्या नंतर हा निर्णय जाहीर केला.परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे .
परीक्षेच्या अगोदर पंधरा ते वीस दिवस अगोदर परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.परीक्षा पुढे गेली म्हणून विद्यार्थ्यांनी विचलित होवू नये.त्यांनी आपला अभ्यास पूर्वीप्रमाणे सुरू ठेवावा असे आवाहन देखील मंत्री सुरेशकुमार यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.
अकरावीची परीक्षा रद्द करण्यात आली असून सगळ्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रमोट केले जाणार आहे.या विद्यार्थ्यांच्या साठी पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी ब्रीज कोर्स ठेवण्यात येणार आहे.प्राध्यापकांना वर्क फ्रॉम होम करावे लागणार असून त्यांनी विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहावे आणि त्यांना मार्गदर्शन करावे असे कळविण्यात आले आहे.
सी बी एस ई आणि केंद्र शिक्षण मंडळाच्या विविध राज्यात होणाऱ्या बारावीच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत.परीक्षेसाठी कार्यरत असणारे विविध खात्याचे कर्मचारी कोरो ना रोखण्यासाठी विविध कार्यात गुंतले आहेत.