Friday, November 15, 2024

/

दिव्यांग व्यक्तींना ‘यांनी’ केली जीवनावश्यक साहित्याची मदत

 belgaum

कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर नियती फाउंडेशनतर्फे शहरातील ज्योतीनगर या दुर्लक्षित वसाहतीतील गरीब गरजू दिव्यांग (शारीरिक विकलांग) व्यक्तींना जीवनावश्यक साहित्याचे किट्स वाटपाचा कार्यक्रम आज सकाळी पार पडला.

शहरातील भाजप नेत्या आणि नियती फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी आज सकाळी भाग्यश्री कोकितकर यांच्यासमवेत ज्योतीनगर वसाहतीला भेट देऊन तेथील लाभार्थी दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक साहित्याच्या किट्सचे वाटप केले. सध्याच्या कोरोना प्रादुर्भाव आणि लॉकडाउनच्या परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्या गरजू लोकांचे जीवनावश्यक साहित्य विना हाल होऊ नयेत यासाठी नियती फाउंडेशनतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी नियती फाउंडेशनचे अन्य सदस्य उपस्थित होते.

मूलभूत नागरी सुविधांचा अभाव दिसणाऱ्या ज्योतीनगर वसाहतीत आरोग्य सुविधांचा देखील अभाव आहे. येथील लोकांच्या आरोग्याबाबतच्या अनास्थेबद्दल नियती फाउंडेशनने याठिकाणी बऱ्याचदा जागृती कार्यक्रमही घेतले आहेत.Niyati foundeshan

मात्र सध्या कोरोना आणि लाॅक डाऊनमुळे या ठिकाणी जीवनावश्यक साहित्य वितरणाचा उपक्रम हाती घेण्यात आला. सदर उपक्रम राबविण्यापूर्वी या वसाहतीतील ज्या व्यक्तींना जीवनावश्यक साहित्याची गरज आहे अशा लोकांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यामधील शारीरिक विकलांग व्यक्तींना आज जीवनावश्यक साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी प्रबोधनही करण्यात आले. ज्या व्यक्ती येऊ शकत नाही त्यांना सदर किट घरपोच पोचविण्याची व्यवस्था नियती फाउंडेशनने केली होती.

लाॅक डाऊनमुळे आज शहरातील कनिष्ठ मध्यमवर्गीय लोकांची कुचंबना होत आहे. हे लोक कांही मागू शकत नाहीत आणि खरेदीही करू शकत नाही. अशा लोकांपर्यंत जीवनावश्यक साहित्य पोहोचविण्याचे काम नियती फाउंडेशन करत आहे. बेळगाव शहराप्रमाणे खानापूर तालुक्यातील आमगाव, देगाव वगैरे अनेक छोट्या -छोट्या खेडेगावांमध्ये देखील जीवनावश्यक साहित्याच्या किट्सचे वितरण करण्याचा उपक्रम नियती फाउंडेशनच्या अध्यक्षा डाॅ. सोनाली सरनोबत यांनी हाती घेतला आहे हे विशेष होय.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.