बेळगावात गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असून बुधवारी २२३४ कोरोना रुग्णांची नोंद झाली तर अकरा कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला.
कर्नाटकात एका दिवसात ३४३८१ रुग्णांची नोंद झाली.बुधवारी ४९९५३ रुग्ण बरे झाले.राज्यात बुधवारी एकूण ४६८ व्यक्ती मृत झाल्या आहेत.
राज्यात रुग्णाच्या संख्येत बेळगाव जिल्ह्याचा तिसरा क्रमांक आहे.बंगलोरमध्ये रुग्णांची संख्या कमी होत असून बुधवारी ११७७२ रुग्णांची नोंद झाले.बंगलोरमध्ये २१८ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
सलग दुसऱ्या दिवशी बेळगाव जिल्ह्यात दोन हजार हुन अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.बुधवारी सापडलेल्या 2234 मध्ये अथणी 259,बेळगाव 372, बैलहोंगल279,चिकोडी 164, गोकाक 308,हुक्केरी 117,खानापूर 185,रामदुर्ग 150 ,रायबाग 232,सौन्दत्ती 111 इतर 57 अशी तालुका निहाय आकडेवारी आहे.