कोविड इस्पितळ नागरी वस्तीत नको अशी मागणी करून हे हॉस्पिटल सुरू केल्याने नागरी वस्तीत याची झपाट्याने लागण होऊ शकते असा आरोप करत तब्बल दोनशे जणांच्या अज्ञात जमावाने इस्पितळावर दगडफेक करीत कर्मचाऱ्यांना देखील धक्काबुक्की केल्याचा प्रकार रविवारी रात्री उशिरा घडला आहे.
या बाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार कोरे गल्ली शहापूर भागांत एका खाजगी इस्पितळात कोविड रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत .जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सर्व खाजगी इस्पितळ बंद न करता कोविड उपचार करा असा आदेश आहे. त्यानुसार या गल्लीत देखील कोविडवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
गल्लीतील रहिवाश्यांना याची लागण होऊ शकते असा आरोप करत जमावाने इस्पितळामध्ये ड्युटी वर असलेल्या नर्स आणि डॉक्टरचे अंगावरील कपडे फाडले यावेळी या भागात बराच गोंधळ निर्माण झाला होता.
डॉक्टर आणि इस्पितळावरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सोमवारी सकाळी 11 वाजता आय एम ए बेळगाव शाखेने बैठक बोलावली आहे त्या नंतर डॉक्टरांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.
काळात फ्रंटलाईन वारीयर्स ठरलेल्या आणि अनेक रुग्णांसाठी देवदूत ठरलेल्या डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
https://www.instagram.com/tv/COrI355Bv26/?igshid=usnntp14f0me