Tuesday, December 24, 2024

/

कोविडचे अतिरिक्त दोनशे बेड उद्या पासून जिल्हा रुग्णालयात उपलब्ध –

 belgaum

बेळगाव परिसरात कोव्हिड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नो बेडची परिस्थिती निर्माण झाली असल्याने गेल्या आठवड्यात बिम्स प्रशासनाला भेट देण्यात आली होती.

त्यावेळी गिरीश दंडगी यांनी 200 बेड वाढवणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते.
पण आजतागायत त्याची पूर्तता न झाल्याने आज परत बिम्सचे संचालक विनय दास्तीकोप यांची भेट घेतली.

दास्तीकोप म्हणाले की जिल्हाधिकाऱ्यांची संमती येणे बाकी असून उद्यापासून आम्ही आणखीन 200 बेड उपलब्ध करणार असल्याचे सांगितले.सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, महाराष्ट्र एकीकरण समितीचे मदन बामणे, सागर पाटील, सचिन केळवेकर, संतोष कृष्णाचे,महादेव पाटील, बाळू जोशी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.