शासनाला बेड वाढवण्यासाठी विनंती केली तरी देखील त्याची दखल न घेतल्याने खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर यांच्या माध्यमातून 30 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर खानापूर तालुक्याच्या जनतेच्या सेवेत रुजू केले आहेत.
एकूण 30 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर पैकी काही स्व खर्चातून काही सामाजिक संस्था तर काही शासनाकडून मिळवले आहेत.बेळगाव सह खानापूर तालुक्यात देखील कोरोनाने कहर घातला असून अनेक रुग्ण दगावत आहेत अश्या परिस्थितीत आमदार निंबाळकर यांनी सेवेत रुजू केलेले 30 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर खानापूर तालुक्यातील जनतेसाठी उपयुक्त ठरणार आहेत.
खानापूर तालुक्याच्या शासकीय दवाखान्याला हे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर दिले.यामुळे खानापूर सरकारी दवाखान्यातील ऑक्सीजन बेडची संख्या १२ वरून कमीत कमी ४२ वर व जास्तीत जास्त ७२ वर गेली आहे.
यातील ऑक्सीजन कॉन्संट्रेटर नंदगड सरकारी दवाखान्यात द्या अश्या सूचना आमदारानी तालुका आरोग्याधिकारी डॉ. नांद्रे यांना दिले. टीएचओ नी ताबडतोब उद्यापासूनच नंदगड ला ऑक्सीजन बेडची व्यवस्था करू असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ऑक्सिजन कॉन्सट्रेटर लोकार्पण करतेवेळी
कार्यक्रमाला मा आमदार डॉ.अंजलीताई निंबाळकर, टीएचओ , सरकारी दवाखान्यातील डॉक्टर, स्टाफ, पत्रकार बांधव, व डॉ अंजलीताई फांऊडेशनचे कार्यकर्ते, कॉंग्रेस ब्लॉक अध्यक्ष महादेव कोळी वगैरे उपस्थित होते.