ऑनलाइन अभ्यासक्रम म्हणजे तशी वर्षभर सुट्टीच अनुभवलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांना आता उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कर्नाटक शिक्षण खात्याने ही सुट्टी जाहीर केली आहे.
आता अभ्यास नसला तरी क्लोजडाऊन आहे त्यामुळे सुट्टी असली तरी मुलांना तिचा आनंद जास्तप्रमाणात घेता येणार नाही.राज्य शिक्षण विभागाशी संलग्न असलेल्या शाळांना ही सुट्टी लागू असेल. या अंतर्गत प्राथमिक शाळा 14 जून पर्यंत बंद राहणार आहेत.
माध्यमिक शाळांच्या सुट्टीचा कालावधी 27 एप्रिल पासून धरण्यात आला असून 31 मे पर्यंत सुट्टी चालणार आहे.
माध्यमिक शाळांना सुटी असली तरी शिक्षकांना सुटका नाही. दहावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून शिक्षकांना आता दहावीच्या मुलांची उजळणी घेण्याचे काम देण्यात आले आहे.