बेळगाव शहरा सोबत तालुक्यात देखील कोविड रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे कालच्या मेडिकल बुलेटिन मध्ये जवळपास एक हजार नवीन रुग्ण सापडले होते त्यापैकी पाचशे रुग्ण बेळगाव परिसरातील होते.
तालुक्याच्या पश्चिम भागातील बेळगुंदी गावामध्ये सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढल्याने ग्रामपंचायत व ग्रामस्थानी शनिवार दि. 8 पासून 15. पर्यंत लॉकडाऊन पुकारला आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने गावामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे बेळगुंदी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून लॉक डाऊन करण्यात येणार आहे . याची सर्व नागरिकांनी व बाहेरील जनतेने नोंद घ्यावी असे ग्रामपंचायतीच्या वतीने कळविण्यात येत आहे .
गावातील सर्व दुकाने व इतर व्यवहार बंद ठेवून दि.8 ते15 पर्यंत संपूर्ण लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे . सर्व नागरिकांना सावधानतेचा इशारा देऊन सूचना करण्यात आल्या.
गावांमध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने व पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने सर्वांना दक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे .कोणीही घराबाहेर पडताना मास्क वापरावा आणि विनाकारण गावामध्ये गर्दी करू नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत .