श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोध्यानगर पेठ गल्ली कडोली यांच्या वतीने कोरोना महामारी संकटावर मात करण्यासाठी स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला.
गावांतील लोकांच्या आरोग्याच्या काळजीपोटी प्रत्येक घरोघरी मंडळाच्यावतीने मोफत वाफारा मशीन व विपो कॅप कॅप्सुल्स चे वितरण मंडळाचे कार्यक्षेत्रातील प्रत्येक घरोघरी जाऊन करण्यात आले व कोरोना विषयी काळजी घेण्या संबंधी प्रबोधन करण्यात आले.
याकामी मंडळाचे कार्यकर्ते सतर्क राहून आयोध्या नगर, पेठ गल्ली ,रामनगर कडोली ,येथील लोकांच्या आरोग्याची काळजी जातीने घेत आहेत त्याबद्दल मंडळाचे कडोली ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे .
गतवर्षी मंडळाच्यावतीने आर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप करण्यात आल्या तसेच सर्व ग्रामस्थांना डेंगू प्रतिबंधक लस मोफत वाटप करण्यात आली, तसेच गावातील सामाजिक बांधिलकी ओळखून कार्यकर्त्यांच्या वतीने स्टेनलेस स्टील संगी (अंत्यसंस्कार करण्यासाठी)गावासाठी मोफत दान करण्यात आलेली आहे.
covid-19 सारख्या जागतिक महामारी च्या संकटात मंडळाने केलेल्या स्तुत्य कामाबद्दल मंडळाच्या कार्यकर्त्यांचं सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.