शहरातील एक प्रतिष्ठित शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गजाननराव भातकांडे इंग्रजी माध्यम शाळा आणि केंब्रिज इंटरनॅशनल स्कुलमध्ये 2021 – 22 च्या शैक्षणिक वर्षासाठी 200 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती शाळेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे यांनी दिली आहे.
कोरोनामुळे अनेक पालकांची आर्थिक स्थिती चांगली नाही. अनेकांसमोर आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रवेशाचे संकट निर्माण झाले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन पालकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी मोफत प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची नोंद घेऊन पालकांनी प्रवेश निश्चित करावा असे आवाहन मिलिंद भातकांडे यांनी केले आहे.
बेळगाव शहराचे पहिले नगराध्यक्ष
गजाननराव भातकांडे यांनी बहुजन समाज शिक्षित व्हावा, समाजातील अंधश्रद्धा दूर व्हावी यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले होते. त्याचप्रमाणे वडिलांपासून मिळालेल्या सामाजिक बांधिलकीचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी मिलिंद भातकांडे कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी मराठा समाजातील गरीब आणि गरजू कुटुंबातील 10 मुलांना भातकांडे शाळेत मोफत प्रवेश दिला जातो. मात्र यावेळी कोरोनाच्या संकटामुळे सर्वच समाजातील नागरिकांना मोठा त्रास झाल्याने यंदा 200 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.
एसपीएम रोड येथील गजाननराव भातकांडे शाळेत एलकेजी व युकेजीमध्ये 110 तर टीचर्स कॉलनी खासबाग येथे सर्व सुविधानी युक्त असलेल्या केंब्रिज इंटरनॅशनल स्कुलमध्ये एलकेजी, युकेजी व पहिली या इयत्तांमध्ये प्रत्येकी 30 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. तसेच 2020 -21 च्या शैक्षणिक वर्षातील वार्षिक शुल्कामध्येही फक्त एक वर्षाकरिता खास सवलत देण्यात येणार आहे, अशी माहिती शाळेतर्फे देण्यात आली असून याचा पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तेंव्हा इच्छुकांनी अधिक माहितीसाठी मुख्याध्यापिका सुवर्णा खन्नूरकर (08884017645), रुपेश (9740757786) किंवा अश्विनी (9844870039) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच https://forms.gle/F73MWn8zzHX4jVqNA या लिंकच्या सहाय्याने आपण आपल्या मुलांचा प्रवेश निश्चित करू करावा. फॉर्म भरल्यानंतर आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी पालकांनी दि. 15 मे 2021 नंतर शाळेला भेट द्यावी, असेही कळविण्यात आले आहे.
आशा प्रसंगी खरेच प्रशंसनीय
Congratulations Milind.. Great job