कोरोनामुळे निर्माण झालेली सध्याची प्रतिकूल परिस्थिती पाहता डीआरडीओच्यावतीने कर्नाटकातही विशेष कोवीड चिकित्सा केंद्रे सुरू करावीत, अशी विनंती उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी नुकतीच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
दिल्ली, वाराणसी आणि लखनऊ या शहरांमध्ये डीआरडीओच्यावतीने विशेष कोवीड चिकित्सा केंद्रं सुरू करण्यात आली आहेत. याच धर्तीवर कर्नाटकातही कोरोना रुग्णांसाठी उपचाराची व्यवस्था करावी.
बेळगाव आणि बेंगलोरमध्ये संरक्षण खात्याची खुली जागा आहे. त्यांचा वापर करून विशेष चिकित्सा केंद्र सुरू केल्यास अनेक रुग्णांना उपचार घेण्यास अनुकूल होईल, असे सवदी यांनी राजनाथ सिंग यांना पाठवलेल्या पत्रात म्हंटले आहे.
सध्या कर्नाटकातही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हॉस्पिटल्समध्ये कोरोना रुग्णांची गर्दी होत आहे. त्यामुळे डीआरडीओच्यावतीने कोवीड चिकित्सा केंद्र सुरू करणे योग्य ठरेल.
संरक्षण खात्याची बेळगाव आणि बेंगलोरमध्ये खुली जागा असून त्याचा वापर यासाठी करता येईल. याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी विनंतीही उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केली आहे.