कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना काही खासगी इस्पितळे आणि प्रयोगशाळा वेगवेगळ्या तपासण्यासाठी दामदुप्पट रक्कम आकारत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
अश्या तक्रारी राज्यात वाढत आहेत त्यामुळे गरीब जनतेला याचा फटका बसत आहे म्हणून राज्य सरकारने याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
खाजगी इस्पितळात होणारी लूट लक्षात घेत याची दखल सरकारने घेतली असून सी टी स्कॅन आणि एक्स रे साठी दर निश्चित केले आहेत.सी टी स्कॅन साठी १५०० रुपये आणि एक्स रे साठी २५० रुपये असा दर सरकारने निश्चित केला आहे.
सरकारने घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णय या बद्दल बेळगावचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री गोविंद कार्जोळ यांनी मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांचे आभार मानले आहेत.