कोरोना रुग्णावर त्वरित उपचार करण्यासाठी सरकारी आणि नोंदणी केलेल्या खासगी हॉस्पिटल दिवस रात्र कार्यरत आहेत.अशा परिस्थितीत कोणत्याही हॉस्पिटलने नकारात्मक बाबी सांगून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी डॉ.एस. व्हि. मुन्याळ यांनी केले आहे.
रुग्णावर उपचार करण्यासाठी ऑक्सिजन आणि रेमडीसिव्हर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाय योजना करत आहे.
नोंदणी केलेली खासगी हॉस्पिटल सरकारच्या मार्गदर्शक सूची नुसार कोरोना रुग्णावर उपचार करत आहेत.त्यामुळे नोंदणी न केलेल्या हॉस्पिटलनी विनाकारण माध्यमांना नकारात्मक माहिती देवू नये.
कोरोना संक्रमण थोपवण्यासाठी आणि रुग्णावर उपचार करण्यासाठी सरकारी आणि नोंदणी केलेली हॉस्पिटल एकमेकांना सहकार्य करत आहेत.यासाठी सगळ्यांनी आरोग्य खात्याला सहकार्य करण्याची गरज आहे असे जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी डॉ.एस. व्हि. मुन्याळ यांनी सांगितले आहे.