वाढत्या कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी बेळगावात तीन दिवस संपूर्ण लॉक करण्याची घोषणा जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी केली आहे.
शनिवार दिनांक 22 रोजी सकाळी 6 ते सोमवार दि 24 रोजी सकाळी 6 पर्यंत याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.एकूण 48 तास म्हणजे दोन दिवस बेळगाव संपूर्ण लॉक डाऊन असणार आहे.
बेळगाव जिल्ह्यात पोजिटिव्ह रुग्णांचा दर वाढल्याने जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी हा निर्णय घेतला आहे.या लॉक डाऊन मध्ये दूध आणि मेडिकल सारख्या जीवनावश्यक वस्तुंना परवानगी असणार आहे या व्यतिरिक्त सर्व व्यवहार बंद असतील.किराणा दुकान आणि भाजीपाला पूर्णपणे बंद असणार आहे.